नागरिकांचे पावसामुळे बेहाल, मुंबई महापालिकाचे अधिकारी जबाबदार : आशिष शेलार
सध्या मुसळधार पाऊस होतोय. यामध्ये अनेकांचे बेहाल होत आहेत. याकरिता मुंबई महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेले नालेसफाईचे आकडे फसवे होते ,असेही शेलार म्हणाले.
२५ वर्षे उबाठा सेनेचा हलगर्जीपणासुद्धा कारणीभूत
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. या सगळ्या मुद्यावरून आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धऱले आहे. कंत्राटदार अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे असे शेलार म्हणाले. 25 वर्ष उबाठा सेनेचा हलगर्जीपणासुद्धा या सगळ्याला जबाबदार आहे असे शेलार म्हणाले.
सहा मजली इमारत कोसळून 15 जण गंभीर तर 5 जण अडकल्याची भीती
मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत
मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे. वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा आणि इतर रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण या परिसरात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे, तर काही ठिकाणी वाहनं वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..
राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी
आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Latest: