सावतंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील टाईप 1 मधुमेहाच्या मुलांची इन्सुलिनसाठी धडपड
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, ह्या सुवर्णक्षणी टाईप1 मधुमेही मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे स्मित उमलायचे राहिले आहे. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय इन्सुलिन साठी त्यांची लढाई वर्षागणिक कमी होत नाही. इन्सुलिन व रक्तातील साखरेच्या नियमीत तपासणी शिवाय हजारों गरीब मुलांचे मृत्यू देखील होत आहेत. पण त्यांना आधार देणारी कोणती ही औपचारिक शासकीय संस्था अस्तित्वात नाही. अशी माहिती समोर येत आहे.
JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी, IIT Bombay ने नोंदणीची तारीख वाढवली, असा करा अर्ज
टाईप 1 मधुमेही मुलाची सर्वांगीण काळजी घेणाऱ्या उडान (UDAAN) या अशासकीय, ना नफा संस्थेच्या संस्थापिका डॉ अर्चना सारडा म्हटल्या “या मधुमेही मुलांना आधार देणारी व्यवस्था नसणे म्हणजे त्यांचा जगण्याचा हक्क हिरावणे असे आहे. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या 75 वर्षां नंतर देखील टाईप 1 मधुमेही रुग्णांसाठी राष्ट्रीय नोंदणी व्यवस्था नाही. हा जीवघेणा आजार आज सुद्धा नॉन कम्युनिकेबल डीसिजेस ह्या किंवा राष्ट्रीय स्वास्थ सेवा किंवा पाठशाळा स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत नोंदणीकृत नाही. टाईप 1 मधुमेह या आजारास कधी शासकीय मदत मिळाली नाही ही खेदाची बाब आहे”
इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन ह्या संस्थे अनुसार भारता मध्ये टाईप 1 मधुमेहाचे 1.25 लाखांपेक्षा अधिक मुले असण्याची शक्यता आहे. पण मुलांच्या मधुमेहाच्या तज्ञांनुसार ही संख्या काही पट अधिक असण्याची संभावना आहे. नॅशनल रजिस्ट्री, राष्ट्रीयकृत नोंदणी नसल्या कारणाने ग्रामीण भागतल्या मधुमेही मुलांची गणना अशक्य आहे.
तीन महिन्यांपासून कांद्याने शेतक-यांना रडवले, नाफेडने खरेदीकरून मीठ शिंपडले
टाईप 1 मधुमेह हा जीवघेणा आजार. मुलांमधे अधिक दिसतो पण कोणत्याही वयात होऊ शकतो. हे रुग्ण दिवसागणिक 4 ते 5 इन्सुलिन चे इंजेक्शन घेऊनच साधारण राहू शकतात. दर दिवशी घ्यावे लागणारे इन्सुलिन ची मात्रा अचूकपणे जाणून घेण्यास, या रुग्णांना रोज 5 ते 7 वेळा रक्तातील साखर तपासावी लागते. इन्सुलिन व तपासणीचा साधारणपणे 3 ते 5 हजार रुपये प्रति माह खर्च येतो.
“हे गृहीत धरून की इन्सुलिन व रक्ताच्या दैनिक तपासण्या , मधुमेही मुलांच्या जगण्याचा आधार आहेत, त्यांना इन्सुलिन , ग्लुकोमीटर व स्ट्रिप सवलतीच्या दरात मिळावे ही काळाची गरज आहे. टाईप 1 मधुमेह ह्या आजाराची एनसीडी प्रोग्रॅम मध्ये गणती व्हावी, तरच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा मधून ग्रामीण भागाच्या मुलांना देखील संपूर्ण उपचार व देखभाल मिळेल” असे डॉ सारडा म्हणाल्या. “आजच्या घडीला शासकीय संस्थांमध्ये, आपत्कालीन उपाचारां शिवाय ,टाइप1 मधुमेहाची संपूर्ण चिकित्सा व उपचार उपलब्ध नाहीत.”
“साधारण कुटुंबांना उपचाराचे दैनिक खर्च परवडत नाहीत. दैनंदिन उपचार नसलेल्या ह्या रुग्णांना बऱ्याच वेळा भरती करून आपत्कालीन उपचार लागतात. हे, त्यामुळे वारंवार गुंतागुंतीची परिस्थिती, किंवा दुष्परिणाम होऊन आयुष्य कमी होण्याचे कारण होते. पाश्चिमात्य देशात टाईप1 मधुमेहाचे रुग्ण पन्नाशी पार सहज जगताना आढळतात, भारतात मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल ह्या पेक्षा जास्त नक्कीच नसावी” डॉ सारडा पुढे म्हणाल्या “गरीब परिस्थिती मूळे, टाईप 1 रुग्ण परिवार बहुतेक वेळा निरनिराळ्या सेवाभावी संस्थांच्या आधारावर निभावताना आढळून येतात”
आज भारता मध्ये हे होणे गरजेचे आहे
1. टाइप 1 रुग्ण गणणे साठी राष्ट्रीय नोंदणी असावी
2. ह्या मुलांना निर्धारित इन्सुलिन मोफत वर्ग व्हावे
3. ग्लुकोमीटर व रक्त तपासणी साठी पट्ट्या सवलतीच्या दरा मध्ये मिळाव्यात
4. प्राथमिक आरोग्य केंद्रातून विस्तृत उपचार मिळावे म्हणून एनसीडी कार्यक्रमात टाईप1 मधुमेह सामील करावा.
5. टाईप1 मधुमेह हा पाठशाळा स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत घेऊन प्रत्येक मुलास आधार द्यावा.
6.आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टाईप 1 मधुमेहाचे प्रशिक्षण द्यावे जेणे करून ग्रामीण भागातल्या मुलांना प्राथमिक उपचार मिळू शकतील.
“औरंगाबाद येथील उडान ह्या ना नफा अशासकीय संस्था द्वारे 1020 गरीब मुलांसाठी उपचार व आधार प्रणाली राबवली जाते. ही मुले कुठल्या ही राष्ट्रीय नोंदणीचा भाग नाहीत. व मराठवाड्यातील कुठल्याही शासकीय दवाखान्यात किंवा वैद्यकीय संस्थेत त्यांना सर्वांगीण उपचार मिळत नाहीत” डॉ सारडा त्यांच्या व्यथा मांडत म्हणाल्या “जर फक्त मराठवाड्या च्या या भागात येवढे रुग्ण असतील तर संपूर्ण देशात चिंताजनक आकडा असू शकतो”
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यास उडान ची मुले देखील उत्साहात सज्ज आहेत. या अविस्मरणीय राष्ट्रक्षणाला ला उद्देशून उडान आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून उडान चे मधुमेही मुले, हम भी कम नाही, या भावनेने सोनेरी महल ते म्हैसमाळ टेकडी असा ट्रेक 14 तारखेस सकाळी 6 पासून दुपारी 3 वाजे पर्यंत सर करणार आहेत. या ट्रेक साठी शंभर मुले उत्साही आहेत आणि खासबात ही देशाच्या इतर विविध भागातून 20 मुले पण या ट्रेक ची शान वाढवणार आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यास व कौतुक करण्यास महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे, हा ट्रेक सोनेरी महला पासून फ्लॅग ऑफ करणार आहेत.