देशराजकारण

मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या घरी सीबीआयची छापेमारी, कारण…

Share Now

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. खत घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सामोरे जाणाऱ्या अग्रसेन गेहलोत यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून. सीबीआयने या प्रकणी अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयने अनेक संशयितांविरुद्ध नवीन गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ९६. ९४ टक्के, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

सीबीआयने शुक्रवार,१७ जून रोजी म्हणजेच आज सकाळी अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपूर येथील निवासस्थानावर छापा टाकला. अग्रसेन गेहलोत खत घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या भोवऱ्यात आहेत. २००७ आणि २००९ मध्ये मोठ्या प्रमाणात खतांची बेकायदेशीरपणे निर्यात झाल्याचा आरोप आहे. नवीन भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात सीबीआयने अजून कोणतीही माहिती उघड केलेली नाही असे देखील समोर येत आहे.

कृषी स्टार्टअप्स : शेती स्टार्टअपसाठी प्रोत्साहन म्हणून सरकार देणार २५ लाख रुपये

ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्यावर कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला असून. डीआरआयच्या कारवाईची दखल घेत, ईडीने सराफ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कार्यवाही सुरू केली आहे. अग्रसेन यांची अनुपम कृषी कंपनी सराफ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पोटॅशची अवैध निर्यात केली आहे. अनुपम कृषीने राजस्थानमधील शेतकऱ्यांना बेकायदेशीररीत्या खतांची निर्यात केली आहे. १३० कोटी रुपयांचे सुमारे ३० हजार टन पोटॅश अवैधरित्या निर्यात करण्यात आले असल्याचा ईडीचा त्यांच्यावर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *