मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा डॉ. आंबेडकर जयंतीबाबद मोठा निर्णय

मुंबई : दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावंट होते. मात्र या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होण्यार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले. २९ मार्च रोजी सहयाद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. तसेच महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्यशासनामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यावर पुढील काम करण्याचे आदेश देखील वळसे पाटील यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरातदेखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.” तसेच १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात काल सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे  उपस्थित होते.

दरम्यान आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत त्यामुळे जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात येणार आहेत. राज्यशासनाच्यावतीने १४ एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच महापरिनिर्वाणदिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्यावतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आल्याचेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *