“सिल्वर ओक” बाहेर झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांना फोन
आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. सिल्वर ओक बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या हल्यासंदर्भात चर्चा केली आहे. तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सुरक्षितते संदर्भातही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावरा झालेल्या हल्याची दखल घेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून चर्चा करून घडलेल्या घटनेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याची सूचना देखील दिली आहे.