राजकारण

मुख्यमंत्री शिंदे यांचे परभणीमध्ये जोरदार प्रचार, लाडकी बहीण योजनेवर ठाम भूमिका आणि विरोधकांवर हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीतील प्रचारसभा: लाडकी बहीण योजनेवर भाष्य, विरोधकांवर निशाणा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणीत होते, जिथे त्यांनी शिवसेना- महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे आणि भाजप- महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचा विज बिल माफ, आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.

काका-पुतण्याची ती जोडी ज्यात ‘बंड’ नव्हते, दोघेही झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेवर आम्ही संघर्ष केला आहे. यासाठी जर जेलमध्ये जावं लागलं, तर एक वेळ नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. मी संघर्षातून वर आलोय, आणि जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, कोणी माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही.”

विरोधकांची टिका करताना शिंदे म्हणाले, “महायुती सरकार म्हणजे देणारी बँक आहे, घेणारी बँक नाही. शेतकऱ्यांच्या विज बिल माफीसह लाडकी बहीण योजना आम्ही राबवली आहे. विरोधकांना याची किंमत कळणार नाही, मात्र आमच्या बहिणींना त्याची किंमत माहित आहे.”

महाविकास आघाडीवर टिका करताना शिंदे म्हणाले, “विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजनेची चौकशी करू, आम्हाला जेलमध्ये टाकू. पण, तुम्ही सरकारमध्ये येणारच नाही!” त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत सांगितले, “आनंद भरोसे आणि मेघना बोर्डीकर यांच्या विजयासाठी मतदान करा. आम्ही तुम्हाला सेवा देण्यासाठी आहोत, आम्ही मालक नाही, सेवक आहोत.”

शिंदे यांनी सभेत आणखी एक आश्वासन दिलं, “23 तारखेला दिवाळीचे फटाके फोडायला मी तुमच्यासोबत येणार आहे. आनंद भरोसे आणि मेघना बोर्डीकर यांना मतदान करा आणि त्यांच्या कामाचा भाग व्हा.”

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *