परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री पर्यावरण मंत्र्यांचा दबाव असल्याचा नोंदवला जवाब
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वझे याना पुन्हा पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव असल्याचं जवाब ईडीला जवाब दिला आहे. यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होताच तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमवीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन यायचे परमवीर सिंह यांनी म्हटले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अशी माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारले असता, त्याला उत्तर देताना परमबीर सिंग यांनी अशी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून २०२० मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.
या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती असेही परमबीर यांनी ‘ईडी’ला सांगितले.