मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तातडीने ‘दिल्लीवारी’, औरंगाबाद दौरा रद्द?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्याला सुरुवात केली होती. मनमाडच्या सभे नंतर तातडीने मुख्यमंत्री यांनी दिल्लीला जावे लागेल अशी माहिती समोर येत आहे, मंत्रिमंडळ विस्तारा बद्दल तातडीची बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा होता. पदभार स्वकारल्या नंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात येणार होते. मात्र आता हा दौरा होईल कि नाही असा प्रश्न उपस्तित होत आहे
गाय आणि म्हशी देखील होऊ शकतात सरोगेट मदर, जनावरांच्या मालकांना याचा होणार फायदा
आठवडयाभरापूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने याच ठिकाणांना भेट दिली होती. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात शिंदे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा आणि रॅली घेणार आहेत, जिथे आदित्य ठाकरे यांनीही भेट दिली. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच युवासेना अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगरचा दौरा करून पक्षाच्या समर्थनार्थ रॅली काढली.
पशु आरोग्य काळजी: जनावर आजारी आहे की नाही? या सोप्या मार्गाने पहा