केमिकल टँकरला गळती ६ जणांचा मृत्यू २० पेक्षा जास्त मजूर गंभीर जखमी
सुरत मध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे, सुरतच्या सचिन डीआयजीसी भागात ही घटना घडली, केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लिक झाल्याने झाल्याने सहा जणांचा मृत्य झाला तसेच या घडलेल्या दुर्घटनेत वीस पेक्षा जास्त मजुरांना श्वास गुदमरल्याने सुरतच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत असुन सचिन जीआयडीसी भागातील आहे. या भागात केमिकल तसेच रासायनिक कारखाने आहे. केमिकल टँकरला गळती लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
केमिकल विषारी असल्याने यात सहा मजुरांना आपला जीव गमवावा लागला तर २० पेक्षा जास्त मजूर सिव्हिल रुग्णालयात दाखल असल्याची माहिती असे हॉस्पिटलचे प्रभारी अधीक्षक डॉ ओंकार चौधरी यांनी सांगितले.
एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. वायू हवेच्या संपर्कात आला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1478914949812420610?t=HC9dt0yxFKcbwN9A-8ExAw&s=19[lock][/lock][lock][/lock]