औरंगाबाद जिल्ह्यातील शाळेच्या वेळेत बदल
उन्हाच्या तीव्रतेमुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून शाळेच्या वेळात काही बदल करण्यात आले आहे. सध्या पाचवी ते आठवीच्या परीक्षा देखील जवळ आल्या आहेत. त्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. वाहत्या उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी घेतला, सकाळी ७.३० ते ११.३० या वेळात शाळा भरणार असून इयत्ता पाचवी ते नववी हे वर्ग यात असतील. पूर्वीपासून सुरू असलेल्या सकाळच्या सत्रात बदल झालेला नाही असे गटणे यांनी सांगितले .
हे हि वाचा धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आलाच नाही ; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
तसेच पाचवी ते नववीच्या परीक्षांचे वेळापत्रक जिल्हा शिक्षण मंडळाकडून निश्चित करण्यात आले असून, १८ ते २६ एप्रिल दरम्यान नववी तर १८ ते २३एप्रिल दरम्यान पाचवी ते आठवीच्या परीक्षा होतील. तालुका स्थरावर शाळेनं वेळापत्रक देण्यात आले असून, चित्रकला, शारीरिक शिक्षण या विषयांच्या परीक्षा शालेय स्थरावर घ्याव्या तसेच, तोंडी परीक्षा देखील शालेय स्थरावर घ्याव्या अशा सूचना कार्याध्यक्ष एन. एम नक्षबंदी यांनी दिल्या.
हे हि वाचा राज्यात फिल्मी स्टाईल ड्रग्स तस्करी ‘या’ शहरात, नायजेरियन आणि केनियन आरोपी ताब्यात