चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर टोला-“उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करण्याची सवय अजूनही सुटली नाही”
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वचननाम्यावर भाजपची टीका
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जाहीरनामे जाहीर करत आहेत, त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील वचननामा जाहीर करण्यात आला आहे. या वचननाम्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. मात्र, भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या वचननाम्यांवर निशाणा साधला गेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
शिंदे टोळीशी जुळवाजुळव करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार, विदर्भातून कोकणात जाण्याचा विचार
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. त्यांनी आपल्या कुटुंबापुरतं राजकारण केलं आणि ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ असं म्हणत सत्ता गमावली. अडीच वर्षे फक्त घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला, कारण त्यांचा डोळ्यात महाराष्ट्राचं हित होतं. पण उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर आता फक्त कुटुंब आहे, त्यांना सच्च्या शिवसैनिकांचा विचार नाही.”
भिंवडी पश्चिममधून चोरगेंना काँग्रेसकडून उमेदवारी, विलास पाटील निवडणुकीवर ठाम
उद्धव ठाकरे यांच्यावर बाणेदार टीका
“उद्धव ठाकरे जी, नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो,” असं सांगत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आपला हल्ला चढवला. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशा प्रकारे, उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय जणवती एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या स्वरूपात पुन्हा तीव्र होत आहे.
Latest: