महाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत खैरेंनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, औरंगाबाद निवडणूक होणार कि नाही? आता मोठा प्रश्न

Share Now

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या कामाला आता वेग आला आहे. अशात शिवसेनेचे नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि किशनचंद तनवाणी यांनी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि महापालिकेचा प्रारुप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करावा, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे, मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि अधिसूचनाही जाहीर झाल्या आहेत. मात्र महापालिकेचा हा प्रारुप आराखडाच वादात सापडला आहे.

औरंगाबाद येथील कन्नड येथे सापडलेल्या बॉम्बचे गूढ पोलिसांनी ४८ तासात उकलले

गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात. प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी. जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात. नकाशावर शहरातील महत्त्वाची ठिकाणे रस्ते, नद्या नाले, रेल्वे लाइन त्यादी स्पष्टपणे दर्शवावे. नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात. नकाशे हाताळता यावेत, यासाठी दोन किंवा तीन भागात तयार करावेत. या मागण्या खैरे यांनी निवडणूक आयुक्तांकडे केल्या आहेत.

टोमॅटोचे संकरित बियाणे उत्पादन तंत्र

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेविरोधात शिवसेनेच्या तिन्ही शहर प्रमुखांनी पक्ष सचिल अनिल देसाईंकडे तक्रार केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समजली. या आराखड्यात शिवसेनेचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली. आराखड्याचे काम सुरु होण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याबाबत काहीही माहिती कळवली नाही, तसेच पक्षाच्या हिताचा विचार केला नाही, अशी तक्रारही त्या पत्रातून व्यक्त केली असल्याची माहिती सू्त्रानी दिली आहे.

औरंगाबाद महापालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर होण्यापूर्वीच व्हायरल झाला. हा सोशल मीडियावरील आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले आहे. असा आरोप करत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *