चहापान बहिष्काराची परंपरा कायम या प्रश्नावर घेरणार राज्य सरकारला
उद्द्या पासून सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशन यात महाविकास आघाडीला विरोधी पक्षाला अनेक प्रश्नावर उत्तर द्यावी लागणार आहे. तसेच गेली नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील दोन अधिवेशनात नरहरी झिरवल यांनी नेतृत्व केलं होतं . मात्र उद्या होणाऱ्या अधिवेशनात अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे.
यंदाचं अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजनार असं चित्र आताच दिसून येत आहे, विरोधीपक्ष नेते देवेंद्रफडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, चहा पानावर बहिष्कार टाकला आहे.
विधानमंडळाचे अधिवेशन सरकारच्या परंपरे नुसार छोटे खाणी घेण्यात येणार आहे. संसदेच अधिवेशन जास्त काळ चालू शकत परंतु याची मानसिकता नाही. यांच्या सारखा भ्रष्ट कारभार राज्यातील जनतेला पाहिलं नाही. ज्याकाही घटना घडल्या नाही परंतु केवळ कारण दाखवून आमचं संख्याबळ कमी करण्यासाठी आमच्या 12 आमदाराच निलंबन करण्यात आलं आहे. सरकार कधीही अडचणीत येऊ शकत याची जाणीव एकप्रकारे त्यांनादेखील आहे. विधान सभा अध्यक्षची निवड होणार असल्याची बातमी आमच्या कानावर आली आहे. मात्र केवळ आमच्या १२ आमदारांना बाजूला ठेऊन हे निवडुक घेत आहेत.
राज्यात ओबीसी आरक्षण बाबतीत त्यांना दोन वर्षांपासून आम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सांगत आहोत. परंतु त्यांनी आता न्यायलायच्या निर्णयांनंतर तीन महिन्याचा वेळ मागितला आहे.
शेतकरी पीकविमा असेल, पेट्रोल आणि डिझेल मध्ये केंद्र सरकारने ५ रुपये आणि १० रुपय डिझेल मध्ये कमी केले मात्र राज्यसरकारने Vat कमी केला नाही.
कायदा सुव्यवस्था याबाबतीत देखील चिंता आहे माजी गृहमंत्री अटकेत आहेत. तसेच विद्यार्थीच्या बाबतीत सरकारला चिंता नाही, एक नाही तर तीन विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी घोटाळा झाला आहेत.
असे आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रक परिषद घेऊन सांगितले.