शिवसेना नेते यशवंत जाधव याच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा चौकशीसाठी दाखल

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास पथक पोहोचलं आहे. सीआरपीएफ जवानांसह पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. ईडीने ही कारवाई केली नसल्याचा दावा केला आहे, त्यामुळे ही इन्कम टॅक्स विभागाची धाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच दाखल झाले. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते.
सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *