केंद्र सरकारची मोठी घोषणा ; कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना ४ हजार रुपये महिना
कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना ४ हजार रुपये महिना, 23 वर्षांचे झाल्यानंतर १० लाख मोदींनी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’चे लाभ जाहीर केले, शैक्षणिक कर्जातही मदत करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’चे लाभ जाहीर केले. याअंतर्गत कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांना दरमहा ४ हजार रुपये दिले जातील. तर २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना १० लाख रुपये एकरकमी दिले जातील.
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा घेतला वेग , रविवारी तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण
आयुष्यमान कार्डद्वारे आरोग्य विमा आणि संवाद हेल्पलाइनकडून भावनात्मक सहकार्य मिळेल. सरकार त्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासही मदत करेल. मोदी म्हणाले, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन कोरोना प्रभावित मुलांचे दुःख कमी करण्याचा छोटा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासी त्यांच्यासोबत आहे. आज जी मुले आमच्या सोबत आहेत आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम होत आहे, त्यांचे दुःख व्यक्त करणे कठीण आहे.
ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !