वाह! मोफत रेशननंतर आता फुकट टीव्ही पाहा!
FREE Dish TV: सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. घरांना मोफत धान्य देण्यासोबतच आता डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
2,539 कोटी रुपये खर्च
होणार दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.
बजरंग दलाचा ‘पठाण’ वर विरोध | Pathan Movie |
मोफत डिश कोणाला मिळणार?
देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे. या योजनेद्वारे डीटीएचचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. यासोबतच जुनी स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आखली जात आहे.
३६ चॅनेल्स
दूरदर्शन अंतर्गत येतात सध्या जवळपास ३६ टीव्ही चॅनेल्स दूरदर्शन अंतर्गत येतात. त्याच वेळी, यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि आकाशवाणीकडे सध्या सुमारे 500 प्रसारण केंद्रे आहेत.