“द काश्मिर फाईल्स” चित्रपट केंद्र सरकारने ‘टॅक्स फ्री’ करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
“काश्मिर फाईल्स” चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. याबाबत भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते. काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्यात यावा यावर विधिमंडळ अधिवेशनात देखील चर्चा झाली.
मिशन मंगल, तानाजी, सुपर 30 आणि पानिपत यापूर्वी चार चित्रपट करमुक्त राज्य शासनाने केले होते. असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, ‘काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी निवेदन दिले आहे. विरोधकांकडून काल या विषयावर घोषणाबाजीही झाली. करमणूक करामध्ये केंद्राचा सीजीएसटी आणि महाराष्ट्राचा एसजीएसटी कर असतो.
त्यामुळे केंद्राने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच काश्मीर फाईल्स करमुक्त होईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सभागृहात मांडली.
‘काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी निवेदन दिले आहे. विरोधकांकडून काल या विषयावर घोषणाबाजीही झाली. करमणूक करामध्ये केंद्राचा सीजीएसटी आणि महाराष्ट्राचा एसजीएसटी कर असतो. pic.twitter.com/3H7BJ0WqUg
— NCP (@NCPspeaks) March 16, 2022