आता स्टार्टअप दिवस साजरा करणार भारत सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला.यावेळी त्यांनी १६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. “स्टार्टअप्स कल्चर” हे भारतीय उद्योगांसाठी नवा पायंडा असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जाईल, स्टार्टअप हे जगभरात भारतीय उद्योगांचे नावलौकिक करणारे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे अभिनंदन केले आहे.
स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. या स्टार्टअप्सची ६ विशेष कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली होती. स्टार्टअप्सनी देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना या माध्यमातून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेण्यासाठी हा संवादाचा उपक्रम हाती घेतला गेला होता.