कॅशलेस व्यवहार करत असाल तर या ५ गोष्टी लक्षात असू द्या

तुम्ही UPI आधारित PhonePe आणि Google Pay ॲप वापरत असाल तर तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. एका अहवालानुसार, भारतात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, UPI पेमेंट करताना या पाच गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा तुमचा आर्थिक व्यवहार सुरक्षित होईल. कॅशलेस व्यवहाराबद्दल असलेली माहिती जाणून घ्या.

पासवर्ड नेहमी सुरक्षित राहील याची काळजी घ्या.
तुमच्या फोनचा स्क्रीन लॉक आणि पेमेंट पिन सेट असायला हवा. किंवा एक महिन्याच्या अंतराने तरी पेमेंट पिन बदलायला हवा. UPI-आधारित व्यवहार करण्यासाठी UPI पत्ता, फोन नंबर, QR कोड आणि आभासी पेमेंट पत्ता (VPA, or yourname@yourbank) शेअर करणे आवश्यक आहे. याशिवाय, upi आधारित पेमेंटशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नये.

व्यवहार करण्यापूर्वी नोंदणीकृत नावाची चौकशी करा.
व्यवहार करण्याआधी पडताळणी आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा UPI ॲपवरून QR कोड स्कॅन करता किंवा नंबर किंवा VPA ची मॅन्युअली पडताळणी करता तेव्हा तुमच्या स्क्रीनवर प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नाव दिसले पाहिजे याची नेहमी खात्री करायला हवी. कारण UPI द्वारे चुकीच्या व्यक्तीला पाठवल्यागेलेले पैसे परत मिळत नाहीत.

UPI आयडी कडे लक्ष द्या
रिमोटली पैसे पाठवण्यासाठी यूपीआय आयडी किंवा क्यूआर कोडने व्यवहार करणे चांगले. कारण फोन नंबरवरून पैसे पाठवताना चूक होण्याची शक्यता जास्त असते. तसेच निधी हस्तांतरित करण्यापूर्वी लाभार्थीसोबत केलेल्या व्यवहारांची पडताळणी करा.

अधिक UPI ॲप वापरणे टाळा:
डिजिटल व्यवहारांसाठी एक यूआयपी ॲप पुरेसे आहे. आता कोणत्याही upi आधारित पेमेंट प्लॅटफॉर्मवरून इतर कोणत्याही ॲप upi वर हस्तांतरण केले जाऊ शकते. इंटरऑपरेबिलिटी UPI द्वारे प्रदान केली जाते. त्यामुळे, विविध प्लॅटफॉर्म, बँक किंवा अॅप्सवर पेमेंटमध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.

UPI ॲप अपडेटेड ठेवायला हवा
UPI ॲप वेळोवेळी अपडेट केले पाहिजे. अपग्रेडमध्ये सुरक्षा अपग्रेड समाविष्ट असतात, जे तुमचे ॲप वापरण्यास सुरक्षित बनवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *