शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावजयीला मारहाण केल्या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यापूर्वीच रमेश बोरणारे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होता. “भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस?” म्हणून भावजयीला मारहाण केल्याचा रमेश बोरणारे यांच्यावर आरोप होता. मारहाण प्रकरणी आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे. रमेश बोरणारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे ती या कार्यक्रमाला गेली होती. दुसऱ्या दिवशी ती वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला गेली असता, तिथे आमदार रमेश बोरणारे यांच्याशी तिची भेट झाली. त्यावेळी, भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस, असा जाब विचारत बोरणारेंनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला होता. रस्त्यावर खाली पाडून लाथांनी मारल्याचा दावाही तिने केला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *