शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे . यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे . शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून २४ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती . त्यानंतर कुचिक यांनी जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा आरोप करत कुचिक यांच्यावर १७ फेब्रुवारीला पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तक्रारीमध्ये पीडित युवतीने गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.
रघुनाथ कुचिक बलात्कार घटना
2दिवसांपासून गायब असलेली मुलगी
गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली
काल रात्री तिचा फोन मला आलेला
इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली
यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयं pic.twitter.com/lTwvHSjvZz— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 16, 2022
पीडित तरुणी बेपत्ता झाली होती. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर व्हिडीओद्वारे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार आरोप केले होते. त्यानंतर २ दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली. काल रात्री तिचा फोन मला आलेला. इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते… पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयंचे चित्रा वाघ यांनी सांगितले .