#BoycottatrangiRe : अक्षय कुणारच्या अतरंगी रे वर बहिष्कार टाकण्याची मागणी
अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे . आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता, परंतु आता सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी होत आहे. सद्या ट्विटरवर #BoycottAtrangiRe ट्रेंड होऊ लागला.
अतरंगी रे’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला आहे. मात्र आता या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. वास्तविक, चित्रपटात सारा अली खान रिंकू या बिहारच्या मुलीच्या भूमिकेत आहे, जिचे विशू (धनुष) या तमिळ मुलाशी जबरदस्तीने लग्न केले जाते. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की रिंकू एका जादूगाराच्या प्रेमात पडते, ज्याचे नाव सज्जाद अली अक्षय कुमार आहे. रिंकू सज्जादसाठी तिच्या पतीला सोडण्यास तयार होते.
रिंकूचे सज्जादवरील प्रेम आणि लग्न सोडणे लोकांना पसंत नाही. लोक याला लव्ह जिहादशी जोडत आहेत आणि म्हणूनच ट्विटरवर #BoycottAtrangiRe बद्दल सतत ट्विट करत आहेत.
चित्रपटात हे दाखवून केवळ लव्ह जिहादचा प्रचार करण्यात आल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपटात हिंदूंना क्रूर दाखवण्यात आले आहे, जे त्यांच्या मुलींचे जबरदस्तीने लग्न लावतात.
O Hindus, unitedly take to streets & protest against the anti-Hindu movie #AtrangiRe in constitutional manner.#BoycottAtrangiRe
Bollywood should be taught a lesson!
Read how the movie promotes #LoveJihad
MARATHI: https://t.co/FHUiovxgYr
KANNADA: https://t.co/yUHvvMzPNK pic.twitter.com/yEOUaiswTW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 28, 2021
https://twitter.com/Vishnugupt__/status/1474955115626962947?t=ty0rOpDYoU199edRXIbM-w&s=08