इंडिगो विमानाला बॉम्ब असण्याची धमकी: रायपूरमध्ये आपत्कालीन लँडींग, २०० कोटींचं झाले नुकसान
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी: रायपूरमध्ये इंडिगो विमानाचं आपत्कालीन लँडींग
गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आलेल्या आहेत. गुरुवारी, नागपूरवरून कोलकाता जाणाऱ्या इंडिगो एअरलाईनच्या विमानाला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली, ज्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. या धमकीमुळे विमानाला तातडीने रायपूर विमानतळावर आपत्कालीन लँडींग करावं लागलं. विमानातील सर्व १५० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
अब्दुल सत्तारांचा वादग्रस्त दावा; “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे”
बॉम्ब धमकीनंतर विमान डायवर्ट
रायपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कीर्तन राठौर यांनी सांगितले की, विमानाची माहिती मिळाल्यानंतर ते रायपूरला डायवर्ट करण्यात आले. विमानाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ आणि रायपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. विमानाची पूर्ण तपासणी केली जात आहे, आणि या धमकीच्या चौकशीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर घणाघात; ‘अर्धे लोक जेलमध्ये जाणार होते’
धमकीच्या सातत्याने वाढत असलेल्या घटनांचा मागोवा:
ऑक्टोबर महिन्यापासून देशभरातील विविध विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आल्या आहेत. तसेच, गेल्या दोन महिन्यांत ९० विमानांना अशी धमकी मिळाली आहे. तथापि, सर्व धमक्या खोटी ठरली आहे, तरीही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, विमानतळांच्या सुरक्षेसाठी आणि आपात्कालीन व्यवस्थेसाठी ही घटना ताणत असताना, एकूण २०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
धमकी देणाऱ्यांची चौकशी:
नागपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ‘जगदीश उईके’ नावाच्या व्यक्तीस अटक केली होती, जो बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या देण्याचा मुख्य संशयित आहे. त्याच्या चौकशीवरून त्याने दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) आणि एटीएसकडून विस्तृत चौकशी सुरू केली जाणार आहे. जगदीश उईकेच्या शालेय शिक्षणाबाबतही माहिती मिळालेली आहे, आणि तो अकरावीपर्यंत शिकलेला असल्याचा दावा करत आहे.