महाराष्ट्र

छ. संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपची आघाडी, अतुल सावे यांचा विजय

Share Now

छ. संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपची आघाडी, अतुल सावे यांचा विजय
सावेचा निसटता विजय, जलीलचा पराभव,  मराठा आणि ओबीसी मतांचा निर्णयात महत्त्वपूर्ण प्रभाव
छत्रपती संभाजीनगरातील अत्यंत चुरशीच्या संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा केवळ १ हजार ७७७ मतांनी पराभव करत विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून जलील आघाडीवर होते, पण अखेरच्या फेरीत सावे यांनी जलीलची आघाडी उलटवत विजय मिळवला.

डोंबिवलीत ठाकरे शिवसेनेचा आक्षेप, मतमोजणीमध्ये बिघाड असल्याचे आरोप

२०२४ च्या निवडणुकीत मतदानात अडीच टक्क्यांनी घट झाली, याचा अर्थ सुमारे ११ हजार मतदान कमी झाले. लाडकी बहीण योजना आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे मतदानाच्या उत्साहाची अपेक्षा होती, परंतु घटलेले मतदान व टेन्शन वाढले होते. सुरुवातीच्या फेरीत जलीलच्या आघाडीने सावे यांच्या चिंता वाढवल्या होत्या, पण अखेर २१ व्या फेरीनंतर सावे यांनी आघाडी घेत विजय संपादन केला.

विजयाचे कारणे:
सावे यांच्या विजयामागे मुख्यतः मराठा समाजाचे विभाजित मतदान होते. या मतदारसंघात सुमारे २४ हजार मराठा मतदार होते, जे विविध पक्षांमध्ये विभागले गेले होते. भाजप विरोधी असलेला मराठा वयोगट, विशेषतः २० ते ४० वयाच्या मतदारांमध्ये भाजप विरोधी सूर असला तरी, ज्येष्ठ मतदारांचा पाठिंबा भाजपला मिळाला. यामुळे ओबीसी, दलित आणि काही मराठा मतांच्या एकत्रित प्रभावाने सावे यांच्या विजयाची पटकवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *