विमानतळ नामकरणासाठी भाजप सेनेची युती
औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप, मनसे असे राजकारण सुरू आहे त्यात चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी दिसले.
औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली. यावेळी “विमानतळाच्या नामकरणाची मागणी करण्यात आली या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही उपस्थिती होती.
केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री @JM_Scindia यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी संभाजीनगर विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करणे, त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे, तसेच विमानतळाचा धावपट्टी विस्तार आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (१/२) pic.twitter.com/tJCaAK5TV4
— Subhash Desai (@Subhash_Desai) May 17, 2022
नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते.
पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी देसाई यांनी केली. मुख्यत्वे मुंबई – औरंगाबाददरम्यान दररोज सकाळी नियमित विमानफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी दिले.