भाजप आमदार बबनराव लोणीकरांची महावितरण अभियंत्याला शिवीगाळ

औरंगाबाद : माजी मंत्री आणि  भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरण अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणीकरांच्या औरंगाबादेतील सातारा परिसर येथील बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यामुळे लोणीकरांनी महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना शिवीगाळ केली.

“तुला एका मिनटात घरी बसवेल, तुझ्या पॉपर्टीची कुंडली काढेल” अशा प्रकारच्या धमक्या लोणीकरांनी अभियंत्याला दिल्या, तसेच “मी मंत्री राहिलेला माणूस आहे. माझ मीटर तू कसा काढल?” असा सवाल देखील लोणीकरांनी दादासाहेब काळे यांना केला. आता हि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत.  त्या ऑडिओ क्लिपमध्ये अभियंता वारंवार तुमचा मीटर काढून नेलेलं नाही असे स्पष्टीकरण देताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *