भाजपच्या ‘या’ नेत्याने दिली पटोलेंना धमकी, तर तुमचा पंजा…
अमरावती :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनील बोंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत नाना पटोले यांना थेट धमकीच दिली आहे. त्यांनी सरळ पटोलेंना शाहिस्ते खानाची उपमा दिली.
माध्यमाशी बोलताना बोंडे म्हणले, ” कॉग्रेसमध्ये होड लागली आहे कि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी किती भुंकायचे, आणि नाना पटोलेंना वाटते कि मॅडम खुश झाल्या पहिले, मी त्यांना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र तोच आहे जिथे शाहिस्ते खानाची बोटे छाटली होती, तर तुमचा पंजा सांभाळा, तोही झटले जाईल” असे वक्तव्य बोंडे यांनी केले.
पटोले यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भंडारा , नाशिक आणि नागपूर या ठिकाणी यांच्याविरोधात भाजपच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेसनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.भाजपच्या ‘या’ नेत्याने दिली पटोलेंना धमकी, तर तुमचा पंजा…
अमरावती :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनील बोंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत नाना पटोले यांना थेट धमकीच दिली आहे. त्यांनी सरळ पटोलेंना शाहिस्ते खानाची उपमा दिली.
माध्यमाशी बोलताना बोंडे म्हणले, ” कॉग्रेसमध्ये होड लागली आहे कि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी किती भुंकायचे, आणि नाना पटोलेंना वाटते कि मॅडम खुश झाल्या पहिले, मी त्यांना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र तोच आहे जिथे शाहिस्ते खानाची बोटे छाटली होती, तर तुमचा पंजा सांभाळा, तोही झटले जाईल” असे वक्तव्य बोंडे यांनी केले.
पटोले यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भंडारा , नाशिक आणि नागपूर या ठिकाणी यांच्याविरोधात भाजपच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेसनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.