Uncategorized

नाना पाटोले विरोधात भाजप आक्रमक, तीन शहरात तक्रार दाखल.. ?

Share Now

काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . पटोले यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भंडारा , नाशिक आणि नागपूर या ठिकाणी यांच्याविरोधात भाजपच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेसनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलीय. यावेळी नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बेताल भडकावू वक्तव्य केले आहे, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या जीवाला धोका निर्माण करणे,पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देणे, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे, जमावबंदी असताना जमाव तयार करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कोरोना नियमांचे पालन न करणे, देशात दंगे होती असे कृत्य करणे, आणि मोदी यांना जीवे मारण्याकरता षडयंत्र तयार करणे या मुद्यातंगर्त नाना पटोले यांच्यावर ७ गुन्हे दाखल करावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
तसेच जोपर्यंत नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयरची प्रत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

नाना पटोले काय म्हणाले,
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

नाना पाटोळेंच वक्तव्यावर स्पष्टीकरण
“माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.
मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *