” २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हा ” एसटी संपाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, सर्व कारवाया देखील घेणार मागे
एसटी संपावर मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २२ एक्प्रील पर्यंत कामावर रुजी होण्याचे आदेश कर्मचार्यांना दिले असून, संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाची दिशाभूल करु नये, असे सांगत न्यायालयाने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. जे संपकरी कर्मचारी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांना त्यांच्याविरोधात बडतर्फी, कोणत्याही कारवाई कर्मचार्यांवर झाली असेल तर हि माघे घेऊ असे महामंडळाने न्यायालयाला सांगितले.
गेल्या सात महिन्यान पासून सुऊ असलेल्या या संपाचा प्रश्न मार्गी लागत नसून. मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची मुभा दिली. पुन्हा असे होणार नाही असे समज देऊन सर्व कर्मचार्यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आदेश महामंडळाला न्यायालयाने दिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
15 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार आहोत, असे राज्य सरकारने न्यायालयात माहिती दिली. FIR मागे घेऊ शकत नाही, असेही राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल, मात्र प्रक्रियेद्वारे, म्हणजे कर्मचाऱ्यांनी अपील करून घेतले जाईल. पुन्हा अशी वर्तवणूक करु नये, अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्या, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कामावर येण्याशिवाय पर्याय नाही.