देश

मोठी बातमी । ‘या’ सुपरसॉनिक मिसाईलची चाचणी झाली यशस्वी

Share Now

भारताने गुरुवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ मिसाइल नवीन प्रकाराची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या मिसाइल चाचणी घेण्यात आली आहे. सूत्रांकडून ही माहिती समोर आली . या संदर्भात सूत्रांनी सांगितले की, हे मिसाईल नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या आधी 11 जानेवारी रोजी भारताने आधुनिक सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची चाचणी घेतली होती.

यापूर्वी, गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई 30 Mk-I वरून ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलच्या हवाई आवृत्तीची यशस्वी चाचणी केली होती. ब्रह्मोस हा सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलच्या विकास, उत्पादन आणि विपणनासाठी भारत (DRDO) आणि रशिया (NPOM) यांचा संयुक्त उपक्रम आहे. ब्रह्मोस ही एक शक्तिशाली मिसाईल शस्त्र प्रणाली आहे जी आधीच सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *