मोठी बातमी ! निर्बंधांबाबत राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. यामुळे राज्य सरकारने रुग्ण संख्या आटोक्यात यावी म्हणून निर्बंध लावले, मात्र सध्या कमी होणारी रुग्णसंख्या बघता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी निर्बंध पूर्ण पुणे उठण्याची असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्यात वाढली त्यातुलनेत या महिन्यात वाढणारी रुग्ण संख्या कमी आहे. त्याअनुषंगाने सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात अतिरिक्त निर्बंध लावली जाणा मात्र इथे काही दिवसात निर्बंध शिथिल केले जातील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधाबाबत चर्चा केली. बऱ्याच ठिकाणी निर्बंध शिथिल झाले असून पुढे हळूहळू निर्बंध शिथिल केले जाईल असे राजेश टोपे यांनी चार दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.