देश

मोठी बातमी ! OBC आरक्षणाची सुनावणी लांबणीवर, ५ आठवडयांनी होणार सुनावणी

Share Now

ओबीसी सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली असून. पाच आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. पाच आठवड्यांनी ही ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली असल्याने साऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे. यासाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार असून याबाबत काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्या नुसार ओबीसी आरक्षणाला परवानगी देण्यात आली होती.

मात्र न्यायालयाकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले की, 367 संस्थामधून ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचितही करण्यात आली होती. राज्यातील ओबीसी आरक्षणामुळे काही निवडणुकांना विलंब झाला आहे, त्यामुळे आता पाच आठवड्यानंतर काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवस रखडल्या आहेत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ओबीसीं समाजाला राजकीय आरक्षण लागू केल्याने हा तिढा सुटला होता, पण राज्यातील ज्या 92 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया अगोदर सुरू करण्यात आली होती.त्या नगरपालिकांमध्ये हे आरक्षण लागू होणार नसल्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

त्यानंतर सरकारकडून आरक्षण लागू करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाल्यानंतर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात सर्व पक्षांना सांगण्यत आले की, 5 आठवडे ज्या प्रमाणे स्थिती आहे तशी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *