राजकारण

मोठा निर्णय ! आता महाराष्ट्र मास्क मुक्त

Share Now

मुंबई : उद्या पासून महाराष्ट्र निर्बंध मुक्त होणार आहे. मास्क बाबद देखील मोठा निर्णय घेणयात आला आहे. मास्क घालणं हे आता सक्तीचे नसेल, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. सर्व निर्बध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत.

महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अमेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला आहे. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मार्च २०२० पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकराचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *