महिलेकडून चोरीचा मोठा पर्दाफाश; व्हॉट्सॲप डीपीने उघडकीस आणली 34 लाख रुपयांची चोरी
महिलेकडून चोरीचा मोठा पर्दाफाश; व्हॉट्सॲप डीपीने उघडकीस आणली 34 लाख रुपयांची चोरी आमचे चांगले क्षण फोटो आणि व्हिडीओद्वारे कॅप्चर केले जातात आणि आठवणींसाठी ठेवले जातात. बहुतेक लोकांना फोटो काढण्याची आवड असते. काहींना हा छंद खूप असतो, पण या छंदाने एका महिलेला तुरुंगात टाकले. महिला चोरट्याने तिच्या व्हॉट्सॲप डीपीच्या माध्यमातून चोरी केल्याचे प्रकरण मुंबईतून उघडकीस आले आहे.
सोलापुरात मतदानाच्या दिवशी काँग्रेसने वळवली रणनीती, सुशील शिंदे यांचा मोठा निर्णय
वास्तविक, 20 वर्षीय महिमा निषादला पोलिसांनी अटक केली आहे. तिने आपल्या मालकिणीच्या घरातून 34 लाख रुपयांचे दागिने चोरले होते. महिमा ही ५७ वर्षीय महिला पांचाली ठाकूर हिच्या घरी काम करत होती, जिने महिमाला तिच्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. पांचालीच्या आईच्या खोलीतील लॉकरमध्ये दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती, त्यातील एक चावी तिच्याकडे आणि दुसरी तिच्या आईकडे होती.
34 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने
एके दिवशी पांचाली ठाकूरने लॉकर उघडले असता लॉकरमधून 34 लाख आणि 5 हजार रुपयांहून अधिक किमतीचे दागिने गायब असल्याचे तिला आढळले. याबाबत पांचालीने तिच्या पालकांशी बोलले असता दागिने आणि पैसे गायब असल्याचे ऐकून त्यांनाही धक्का बसला. तर दुसरीकडे महिमा काही मुद्द्यावरून रागावून आधीच काम सोडून गेली होती. पांचाली तिच्या भावासोबत वेगळी राहते. त्यामुळे ती परत जायला लागली तेव्हा तिला पुन्हा महिमाला फोन करून बोलवायचं होत.
नोटबंदी करता आणि…; सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी
व्हॉट्सॲप डीपीवरून चोरी पकडली
पांचालीने तिला कॉल करण्यासाठी महिमाचा नंबर डायल केला तेव्हा महिमाचा डीपी पाहून पांचालीला आश्चर्य वाटले. कारण महिमाने तिच्या डीपीवर फोटो लावला होता. त्यात महिमाने पांचालीच्या आईची अंगठी आणि गळ्यात सोन्याचा हार घातला होता. हे पाहून पांचालीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. महिमा उत्तर प्रदेशची असून ती मुंबईतील वाकोला येथे राहते. पोलिसांनी तत्काळ महिमाच्या घरी पोहोचून तिला अटक केली. अशातच फोटोंची शौकीन असलेल्या महिमाची चोरी तिच्या व्हॉट्सॲप डीपीवर टाकलेल्या फोटोवरून पकडली गेली.