भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा शपथ विधीसोहळा आज पार पडला. भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते संगरूर मतदार संघातून दोन वेळा आपचे खासदार राहिले आहेत.या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि इतर नेते उपस्थित होते. कॉमेडियन, गायक, लेखक, खासदार ते आता पंजाबचे मुख्यमंत्री असा त्यांचा जीवन प्रवास राहिला आहे.
या शपथविधीच वैशिष्टय म्हणजे स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.