महाराष्ट्र

हिवाळ्यात आरोग्यसाठी सर्वोत्तम आहार पण मागणी वाढल्यामुळे बाजरीच्या किंमतीत वाढ !

Share Now

हिवाळ्यात आरोग्यसाठी सर्वोत्तम आहार पण मागणी वाढल्यामुळे बाजरीच्या किंमतीत वाढ !

बाजरीच्या दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना फायदा आणि ग्राहकांना संकट!
जिल्ह्यात हिवाळ्याच्या सुरुवातीस बाजरीच्या दरात कमालीची वाढ झाल्यामुळे बाजारात चांगलेच हाल झाले आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून बाजरी २,७०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली आहे. किरकोळ बाजारात बाजरी ३५ ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. यंदा बाजरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत आणि येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“पालघर: विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार का बनला जीवघेण्या संकटाचे कारण?”

हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे बाजारात मागणी वाढली आहे, विशेषत: सांधेदुखी, सर्दी आणि इतर हिवाळ्याच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी या पदार्थाचा वापर अधिक होतो. यंदा बाजरीचे उत्पादन कमी झाल्याने तिच्या दरात वाढ झाली आहे. अनेक शेतकरी घरापुरतेच बाजरीचे उत्पादन घेतात, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन आहे.

वर्तमान परिस्थितीत गव्हाच्या तुलनेत बाजरीचे दर अधिक आहेत. गव्हाचे दर ४० ते ४५ रुपये प्रति किलो असताना, बाजरी ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील वर्षी बाजरीचे दर ३० ते ४० रुपये प्रति किलो होते, जेव्हा यावर्षी त्या दरात २० रुपयांची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना फायदा होतोय, तर ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *