महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या सभेपूर्वी ; व्हिडिओची चर्चा

Share Now

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भोंग्याच्या वादामुळे चर्चेत आले आहेत. खरे तर राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर वरील अजानच्या निषेधार्थ हनुमान चालीसा वाजवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, राज्यात राजकीय पेचप्रसंग असताना, राज ठाकरे उद्द्या होणाऱ्या सभेत काय बोलणार याची उत्सुकता लागून आहे.

राज ठाकरे यांची रविवार दि २२ मे रोजी सकाळी सभा १० वाजता पुणे येथे गणेश कलक्रिडा मंच, स्वारगेट येथे सभा होणार आहे. यापूर्वी त्याच्या सभेचे टिझर मात्र चर्चेचा विषय बनले आहे.

हेही वाचा :- संभाजीराजे छत्रपती शिवसेनेची ऑफर स्वीकारणार ?

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील एक टिझर ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी लिहाल कि, गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा झाली, मग अनधिकृत भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्याच्या शिव संपर्क अभियान सभेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती यावर काय बोलणार हे देखील महत्वाचं आहे .

काहींना बाळासाहेब दिसतात कधी शाल घेऊन फिरतात, कधी हिंदुत्व तर कधी मारुतीच्या नादाला लागतात. या मुन्ना भाईचा केमिकल लोचा झाला आहे .. अशी टीका त्यांनी शिव संपर्क अभियान दरम्यान केली होती.

हेही वाचा :- 7 वा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26000 रुपये, फिटमेंट फॅक्टर अपडेट – कॅबिनेट बैठकीत निर्णय होणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *