Baramati अजित पवार विजय होण्याची शक्यता? हरवणार पुतण्याला?
Baramati अजित पवार विजय होण्याची शक्यता? हरवणार पुतण्याला?
बुधवारी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर, २३ तारखेला मतमोजणी होणार असून त्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल, कोणता उमेदवार निवडून येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे, कारण इथे अजित पवारांना त्यांच्याच सख्ख्या पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे.
मतदान केंद्रावर तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सकाळच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बारामतीमध्ये जनतेचा कल महायुतीकडे आहे आणि अजित पवार यांच्या विजयाचे संकेत आहेत. ३५ वर्षांपासून बारामतीतील सत्ता राखलेल्या अजित पवार यांना यावेळी त्यांच्या पुतण्याचा कडवा प्रतिस्पर्धा मिळाल्याचं दिसत आहे, पण एक्झिट पोलच्या प्राथमिक आकडेवारीनुसार अजित पवार यांचे पारडं जड दिसते.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
गेल्या काही वर्षांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडल्यामुळे अजित पवार यांनी बारामतीतील प्रत्येक भागात आपला ठसा उमठवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारांची मते अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं दिसतंय.
२३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीमध्ये बारामतीतील राजकीय चित्र स्पष्ट होईल, परंतु सध्याच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार यांची विजयाची संभावना प्रबळ दिसते.