B.Tech पदवी असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची संधी, लवकर करा अर्ज.

बीटेक उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने विविध बँकांमध्ये SO म्हणजेच विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 21 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेद्वारे, IBPS विविध बँकांमध्ये SO स्केल 1 अधिकाऱ्यांच्या एकूण 884 पदांची भरती करेल. या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच वैध असतील. पोस्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज वैध ठरणार नाहीत.

डिलिव्हरी बॉयला कोण टार्गेट करतंय? तीन दिवसांत तीन घटना!

कोणाच्या किती पदा?
-कृषी क्षेत्र अधिकारी: 346 रिक्त जागा
-मानव संसाधन / कार्मिक अधिकारी: 25 रिक्त जागा
-आयटी अधिकारी: 170 जागा
-कायदा अधिकारी: १२५ जागा
-विपणन अधिकारी: 205 रिक्त जागा
-राजभाषा अधिकारी: 13 पदे

विवाहित पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर केला अत्याचार, बनवला व्हिडिओ

अर्जाची पात्रता
आयटी ऑफिसर स्लॅक 1 पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये 4 वर्षांची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तर कृषी अधिकाऱ्यासाठी अर्जदाराकडे कृषी विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिक पात्रता संबंधित माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत भरती जाहिरात पाहू शकतात.

वयोमर्यादा- अर्जदाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३ वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज फी – सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 850 आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग अर्जदारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे.

डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट.

IBPS SO भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा?
-IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जा.
-होम पेजवर SO Apply च्या लिंकवर क्लिक करा.
-आता फोन नंबर इत्यादी माहिती टाकून नोंदणी करा.
-अर्ज भरा आणि तपशील प्रविष्ट करा.
-अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

निवड कशी होईल?
SO पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राथमिक परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत. मुख्य परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल आणि त्याचा निकाल जानेवारी/फेब्रुवारी २०२४ मध्ये जाहीर केला जाईल.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *