गुणरत्न सदावर्ते याना जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे घातलेल्या राड्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनही एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.
हेही वाचा :- नवाब मलिक याना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका
या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एसटीच्या ११५ कर्मचाऱ्याना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे . गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. आंदोलक कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी
खा. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात सदावर्ते यांच्यासह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय. मात्र, याची डिटेल ऑर्डर येण्यासाठी संध्याकाळ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती जेल प्रशासनाकडे जाईल. त्यामुळे उद्या या सर्व आरोपींची सुटका होऊ शकते. मात्र, उद्या जर त्यांची सुटका झाली नाही तर परवा रविवार आहे. त्यामुळे सर्वांची सुटका होण्यासाठी सोमवारही उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :- फोन टॅपिंग प्रकरण ; संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ बोगस नावाने फोन टॅपिंग