वकील गुणरत्न सदावर्तेसह ११५ कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानासमोर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राडा घातला होता. याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एसटीच्या ११५ कर्मचाऱ्याना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होते.
शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्त यांच्यासह ११५ कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.
गुणरत्न सदावर्ते यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला असून .मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना कोल्हापूर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले.
गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना आणि अन्य 115 एसटी कर्मचाऱ्यांना आता जामीन मंजूर झाला आहे. ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे जामीन मिळूनही त्याची सुटका झालेली नाही.
कोल्हापुरातील शाहूपुरी येथे मराठा समाजावर जातीय द्वेष निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अकोट पोलिसांनीही सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची मागणी केली होती. 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्यामुळे हे प्रकरण ताब्यात घेण्याची विनंती त्यांनी मुंबई गिरगाव न्यायालयाला केली आहे.
हेही वाचा :- कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार !