औरंगाबादेत वाहनांचे होणार स्क्रँपिंग
औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि नाशिक या चार शहरात दोन आणि तीन चाकी वाहनाचे स्क्रँपिंग आणि नंतर स्टीलचा पुनर्वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने उद्योग , ऊर्जा आणि कामगार विभागामार्फत सिरों महिंद्रा रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे.
केंद्रीय प्रदूषण बोर्डाने सूचित केलेल्या कायदेशीर आणि पर्यावरण पूरक नियनानुसार या स्क्रँपिंग केंद्रामध्ये दोन चाकी आणि तीन चाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचे स्क्रँपिंग व पुनर्वापर करण्याची क्षमता असेल. वर्षाला ४० हजार वाहने या केंद्रात स्क्रँपिंग होऊ शकतील . त्याचबरोबर स्टीलच्या पुनवापर मुळे स्टील आयातीत घट होईल.
पुण्यात सिरोकडून स्क्रँपिंग पुनर्वापर केंद्र चालवले जात आहे. त्याचबरोबर देशात नोएडा, चेन्नई, पुणे सह १० ठिकाणी अशी केंद्र आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व्हेइकल सक्रेपेज पॉलीसी जाहीर केली आहे.
मुंबई येथे झालेल्या महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिकमधील गुंतवणूक संधी या परिषदेच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राज्याचा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग नियमांनुसार या प्रकल्पांना आवश्यक मंजुरी प्रदान करणार आहे. सिराेची पुनर्वापर केंद्रे ग्राहकांना त्यांची वाहने स्क्रॅप करण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देतील. ग्राहकाला फक्त १८००-२६७-६००० वर मिस्ड कॉल द्यावा लागेल किंवा cerorecycling.com वर लॉग इन करून माहिती घेता येईल.