औरंगाबाद शासकीय रुग्णालयातील परिचारिका दोन दिवस संपावर!
औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका दोन दिवस संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
विविध मागण्यांवर घाटीत परिचरिकांनी संप पुकारला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी झाले आहे.त्यामुळे साफसफाईच्या कामावर परिणाम झाला आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर घाटी परिसरात बुधवारी सकाळी घोषणाबाजी झाली. या वेळी परिचारिका संघटनेच्या इंदुमती थोरात, शुभमंगल भक्त, महेंद्र सावळे, मकरंद उदयकार आदींची यावेळी उपस्थिती होती.