औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई, अमली पदार्थांचा साठा जप्त
औरंगाबाद जिल्यात नशेखोरी मुळे गुन्हे वाढत आहे, त्यातच ‘बटन’ म्हणजेच नायट्रोसन या मेडिकल उपयोगी गोळीने युवक नाश करतात आणि त्याला नशेखोरांनी ‘बटन’ असे नाव दिले आहे, याच गोळ्यांचा साठा औरंगाबाद पोलिसांनी उस्मानपुरा परिसरातून जप्त केला आहे. तब्बल ५५५ गोळ्या आणि १३९० रुपय नगात एक चारचाकी गाडी आणि धारदार शास्त्र देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.
मोदींसाठी देहू संस्थानाकडून हि ‘खास’ पगडी, काय आहे वैशिष्ट्य पहा
औरंगाबादमधील उस्मानपुरा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींनी या गोळ्या सेलू येथील डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आणण्याचे सांगितले. तसेच ही चिठ्ठी परभणी आणि लातूर येथील ओळखीच्या मेडिकलवरून घेतल्याची कबुलीही दिली. त्यामुळे नशेच्या गोळ्या खरेदी आणि विक्रीचे हे रॅकेट मराठवाड्यात पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार, परभणी, लातूर जिल्ह्यातील मेडिकलवालेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
Nano DAP: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, युरियानंतर आता DAP मिळणार बाटलीत
दरम्यान, या कारवाईत राम धोंडू काळे आणि दीपक साहेबराव हिवाळे या दोन आरोपींना अटक करण्यात अली आहे, आरोपी दीपकने सांगितलं की, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका डॉक्टरांच्या प्रस्क्रिप्शनवरून महिलेच्या मेडिकलमधून या गोळ्या खरेदी केल्या. तसेच काही गोळ्या लातूर येथून खरेदी केल्या. तेथून आणलेल्या या गोळ्या चढ्या दराने विक्री करीत असल्याची कबुली आरोपींनी दिली. दरम्यान, अन्य एका कारवाईत वाळूज परिसरात एकाला नशेच्या गोळ्यांचा पुरवठा केल्या प्रकरणी अटक झाली. वाळूज पोलिसांनी जळगावच्या मेडिकल दुकानदाराला अटक केली होती. 04 जून रोजी ही कारवाई झाली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोहम्मद अल्ताफ निसार शेख असं अटक केलेल्या अरोपीचं नाव आहे.