औरंगाबाद मनपाने घेतले तब्बल ७ नवीन वाहन, इलेकट्रीक कारचा देखील समावेश
औरंगाबाद : जिल्ह्याचे मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते आज महानगर पालिकेने घेतलेल्या ७ इलेक्ट्रिकल कार, २ जेसीबी, ४ बॅकहोल लॉडर आणि ३ टिप्पेरचे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार या इलेकट्रीकल कर विकत घेण्यात आलेल्या आहे, जेणे करून गाड्याच्या डिझेलवर होणार आर्थिक खर्च कमी करता येईल.
तसेच टिप्पर, जेसीबी घेण्यामागे मनपाला कायम स्वरूपी उपयोगाला येणारे आणि किरायाच्या जीसीबी आणि टिप्पर मध्ये अधिकचे पैसे न घालवता कायम स्वरूपी औरंगाबाद मनपाला सक्षम करण्यासाठी हे वाहन घेण्यात आले आहे. तसेच, या उदघाटन सोहळ्या प्रसंगी स्वतः जीसीबीमध्ये स्वतः बसून फोटो काढले, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी या गाड्यांचे उदघाटन केले.