महाराष्ट्र

गुगलद्वारे वाहतूक डेटा सार्वजनिकपणे प्रसिद्ध करण्यात औरंगाबाद ठरले पहिले शहर

Share Now

औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर ठरले आहे ज्यासाठी गुगलने एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर डेटा प्रकाशित केला. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात औरंगाबादचा वाहतूक डेटा सार्वजनिकरित्या लाँच करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे, औरंगाबाद महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

अधीर रंजन यांनी द्रौपदी मुर्मूला ‘राष्ट्रीयपत्नी’ म्हटले! मग म्हणाले- चुकून बोलले गेले, आता काय?

बुधवारी नवी दिल्ली येथे संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली डेटा लॉन्च करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गुगलने औरंगाबाद शहरासाठी इनसाइट्स एक्सप्लोरर डेटा लाँच केला आहे. यावेळी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे हवामान बदल विभागाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आदित्य तिवारी यांनी या कार्यक्रमात औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले असून. भारतातील पहिले शहर म्हणून औरंगाबाद ठरले आहे.

मत्स्यपालनासाठी 60% अनुदान, कसे घ्यायचे ते जाणून घ्या

नेमका काय होणार फायदा ?

गुगलकडे एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर नावाचे एक फिचर आहे, जे शहरांना कार्बन उत्सर्जन स्त्रोतांचे मोजमाप करण्यास, विश्लेषण करण्यास, उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणे तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होते. भारतामध्ये गुगलचे एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोर फिचर केवळ बँगलोर, चेन्नई, पुणे आणि औरंगाबादसाठी उपलब्ध आहे. तर या चार शहरांपैकी गुगलद्वारे वाहतूक डेटा सार्वजनिकपणे प्रसिद्ध करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर म्हणून निवडले गेले आहे. हा डेटा शहरांचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *