महाराष्ट्र

औरंगाबाद विमानतळाचे लवकरच नामकरण होणार

Share Now

औरंगाबाद शहरातील विमानतळाचे नामकरण लवकरच होणार असून त्यासोबतच कोल्हापूर, शिर्डी अशा १३ विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आला आहे, या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात निर्णयाची शक्यता आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर डॉक्टर भागवत कराड बुधवारी औरंगाबाद शहरात आले. त्यावेळी विमानतळ नामकरण विषयी भाष्य केले असता त्यांनी हरडीपसिंग पुरी नागरी मंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव आला होता. प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यावर देशात किती मंडळाचे नामकरणाची प्रस्ताव आहेत याची विचारणा पंतप्रधान कार्यालयाने नागरिक उड्डयन मंत्रालयाकडे केली होती.

प्रत्येक राज्याकडून आलेल्या माहिती प्रमाणे १३ विमानतळाच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत. त्यात महाराष्ट्रातून औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डी विमानतळाचा प्रस्ताव आहे.
अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी दिली. त्या खात्याचे विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच एकत्रित प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवतील असे , केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *