किशोरवयीन मुलीवर रुग्णालयात अत्याचार करण्याचा प्रयत्न
पाटणा : बिहारच्या सरकारी रुग्णालयात महिला, मुली सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले. वैशाली येथील रुग्णालयात सुरक्षा कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पाटण्याच्या रुग्णालयात १७ वर्षीय किशोरीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.
पीडिता तिच्या मैत्रिणीचा वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी रुग्णालयात गेली असता संगणक ऑपरेटरने खोलीचा दरवाजा लावून अत्याचाराचा प्रयत्न केला. तिच्या तक्रारीवरून अतुलकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.
पीडिता मुंगेरची रहिवासी महिन्यांपासून तिच्या मैत्रिणीच्या असून, पाटण्यात किरायाने राहून आईवर आयजीआयएमएसमध्ये शिक्षण घेते. मागील अनेक उपचार सुरू आहेत.
आरोपवर गुन्हा दाखल
■ ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ती मैत्रिणीसह अहवाल आणण्यासाठी गेली होती. ती आत जाताच ऑपरे- टरने तिची मैत्रीण व इतर कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवले. बोलण्यात गुंतवून खोलीचे दार लावले व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
■ काही वेळाने तिची मैत्रीण आली असता दार बंद पाहून तिला शंका आली. तिने इतरांच्या मदतीने दार उघडले. त्यावेळी पीडितेने सर्व माहिती दिली.
■ याबाबत इतरांना माहिती मिळताच रुग्णालयात गदारोळ झाला. याचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
एप्रिल पर्यंत एकलाख तरुणांना थेट रोजगार , या क्षेत्रात आहे तरुणांना मोठी संधी