क्राईम बिटराजकारण

भाजप महिला आमदाराच्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न

Share Now

 

भाजप आमदार नमिता मुंदडा आणि यांचे पती अक्षय मुंदडा उसाचा रस पिण्यासाठी रसवंती वर गेले असता, मद्यधुंद असलेल्या सहा जणांनी त्यांच्या शिपायाच्या गळ्याला चाकू लावून लुटलं आहे. तर यादरम्यान आरडाओरड कानावर येताच, सोडविण्यास गेलेल्या अक्षय मुंदडा यांना देखील खल्लास करून टाकण्याची धमकी देण्यात आलीय. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली आहे.

आ. नमिता मुंदडा यांच्या शिपायाचे नाव मुराजी प्रकाश साखरे असे आहे. त्यांनी तक्रारीत सांगितले कि, सायंकाळी ५ च्या दरम्यान आ. नमिता मुंदडा, पती अक्षय मुंदडा हे रस पिण्यासाठी बीड रोडवरील एका रसवंतीत गेले होते. यावेळी मुराजी रस पिऊन रसवंतीच्या बाहेर थांबले असताना , त्याचवेळी शेजारच्या हॉटेलमधून लखन भाकरे रा. अंबाजोगाई हा अन्य ५ जणांसोबत तिथे आला. त्याने मुराजीच्या गळ्याला चाकू लावून दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि ६ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

याप्रसंगी मुराजीचा साखरेचा आरडाओरडा ऐकून अक्षय मुंदडा आणि अन्य काहीजण धावत आले आणि त्यांनी लखन भाकरे याला पकडले. यादरम्यान त्याचे साथीदार शेजारच्या शेतात पळून गेले. यावेळी लखनने “अक्षय मुंदडा यांना मला सोड नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत आहे”, अशी धमकी दिली.
अक्षय मुंदडा यांनी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि लखनला पोलिसांच्या ताब्यात दिले . असं शिपाई मुराजी यांनी तक्रारीत नमूद केलंय. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात लखन भाकरे आणि अन्य ५ जणांवर कलम ३९५, ३९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *