अमरावतीत शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार
सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीची शिकवणी घेणा-या तसेच तिला वेळोवेळी व्हिडीओ कॉल करून अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध अमरावती येथील गाडगेनगर पोलिस स्टेशनला बलात्कार, पोस्कोसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल भास्करराव शिंदे (वय ३८) रा. तपोवन अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सुरुवातीला या प्रकरणी अतुल शिंदे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र कोतवाली पोलिसांनी शिंदे याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हची पाहणी केली असता त्यात सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे उघडकीस आले.
अत्याचाराचे घटनास्थळ गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध तेथे बलात्कार, पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. तो सहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत आहे.
काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांने घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा बाथरूममध्ये चित्रीकरण करत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात या घटनेने आणखी खळबळ उडाली आहे.